गतिमंद बालकाचा खून करून फरार झालेले जोडपे जेरबंद !

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराला हादरवून सोडणाऱ्या निष्पाप गतिमंद बालकाच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत तब्बल ५०० किलोमीटरचा थरारक पाठलाग करून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संतोष सोनाजी ढाळे (वय २४, मूळ रा. मोप, ता. रिसोड, जि. वाशीम) आणि पूजा राजू पाडेवाड (वय २२, मूळ रा. सगरोळी जवळ, ता. बिलोली, जि. नांदेड; दोघे रा. सध्या सावित्रीनगर, चिकलठाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
एमआयडीसी सिडको ठाण्याच्या हद्दीत ४वर्षीय गतिमंद बालकाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी वैद्यकीय अहवालात श्वास
आरोपी संतोष ढाळे पूजा पाडेवाड
कोंडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्या बालकाचा सांभाळ करणारे जोडपे पसार झाले होते. त्यामुळे वडील आणि आईनेच खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, गुन्हे शाखेने आरोपींना अटक केल्यानंतर ते त्याचे आई-वडील नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ते नेमके कोण, हे बालक कोणाचे, याबाबत दुसऱ्या दिवशीही संभ्रम कायम होता.
पोलिस पोहोचले घरी
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ हे हवालदार विजय निकम, राजेश यदमळ, जालिंदर गोरे, राहुल बंगाळे, माया माळी आणि संतोष चौरे यांच्या पथकासह आरोपींच्या शोधासाठी रिसोड, वाशिम, अकोला असा प्रवास करत आरोपीच्या घरी पोहचले. तेथे नातेवाईकांना ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर आरोपीचा एकाला फोन आला. तेव्हा आरोपी हा तथाकथीत पत्नीसह देऊळगाव राजा येथे असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार देऊळगाव राजा ठाण्याचे निरीक्षक ब्रम्हा गिरी यांना आरोपींची माहिती दिल्यानंतर त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
जबाबात विसंगती
आरोपी संतोष ढाळे याचे पूर्वी लग्न झालेले आहे. आरोंपी पूजा पाडेवाड हिच्यासोबत तो लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे सांगतो, तर कधी दोघेही आम्ही लग्न केल्याचे सांगतात. त्याचवेळी आरोपी महिला ही मृत बालक माझ्या बहिणीचे मुल असून, त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे सांभाळत असल्याचे सांगते. तर दुसऱ्या वेळी ते मुल चोरून आणल्याचेही सांगते. यामुळे पोलीस बालकाचा आरोपीसोबत संबंध काय, याचा शोध घेत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions